For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

स्वातंत्र्य लढ्याचा आणि तुमचा संबंध काय – ठाकरे

9 days ago | द वायर मराठी टीम
स्वातंत्र्य लढ्याचा आणि तुमचा संबंध काय – ठाकरे

हिंदूत्वाचा बुरखा घातलेला खोटा पक्ष अशी भाजपची संभावना करीत, स्वातंत्र्य लढ्याचा आणि तुमचा संबंध काय असा सवाल करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट आरोप केला.

बांद्रा-कुर्ला संकुलाच्या मैदानावर झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. शिवसेनेचे राज्य सरकारमधील मंत्री, आमदार आणि पदाधिकारी यावेळी उपासतहीत होते.

ठाकरे म्हणाले-    

– भाजप तेंव्हा नव्हता पण त्यांची मातृ संस्था असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता. तुमचा आणि आणि स्वातंत्र्य लढ्याचा संबंध काय. संघाचा आणि स्वातंत्र्य लढ्याचा संबंध काय. तुम्ही त्या लढ्यात कुठे होता. संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू असताना, भाजपचा अगोदरचा अवतार असणारा जनसंघ होता. तो संयुक्त महाराष्ट्र समितीमधून पहिल्यांदा बाहेर पडला. तेंव्हापासून मुंबई तोडण्याचा यांचा डाव आहे. बुलेट ट्रेन हा मुंबई तोडण्याचा डाव आहे. मुंबई त्यांना ओरबाडण्यासाठी हवी आहे. मात्र मुंबई स्वतंत्र करण्याचा डाव आम्ही हाणून पाडणार. आम्ही रक्त सांडून मुंबई मिळवली आहे, ती जाऊ देणार नाही.

– खोटा हिंदूत्वाचा बुरखा घातलेला पक्ष देशाची दिशा बदलवत आहे. हिंदूत्वाचा रक्षक भाजप असल्याचा भ्रम निर्माण केला जात आहे. हिंदूत्वाचा चेहरा फटल्यावर त्यांचा भेसूर चेहरा दिसत आहे. महागाईवर टीका करणारा बैलगाडीतून जाणारा अटल बिहारी वाजपेयी यांचा भाजप कुठे आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये चिंतन नव्हे कुंथन चालते. तिथे शिकलेले कार्यकर्ते कुठे आहेत. खोटे बोलायला शिकवले जाते का. खोटे बोलणे, हे त्यांच्या हिंदूतत्वात बसते, आमच्याकडे नाही. ही लंडग्यांची फौज, त्यांना संस्कार नाही. भगवी टोपी घालून हिंदुत्व येत नाही, डोक्यात मेंदू असायला हवा आणि आरएसएसची टोपी काळी का?

– बोगस हिंदूत्ववाद्यांनी मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर सरकार स्थापन केले होते. काश्मिरमध्ये काय चालले आहे. गोळ्या घातल्या जात आहेत, हा काश्मिर फाईल्सचा दूसरा भाग आहे का?

– पंतप्रधानांनी आमच्या राज्यावर पेट्रोल दरवाढीसाठी आरोप केला पण जीएसटीचा परतावा द्यायला नको. लाज लज्जा नाही आणि कर्तूत्व नाही, महागाईवर बोलत नाहीत. गो कोरोना गो म्हणून वाजवलेल्या थाळ्या आजही रिकाम्या आहेत. देशाला कुठे घेऊन चालले आहेत. सुसंस्कृतपणा निघून चालला आहे. उद्या दाऊदलाही पक्षात घेऊन मंत्री करतील. इडी सारख्या संस्था मागे लावून धमक्या देऊ नका. आम्हीही सोडणार नाही. श्रीलंकेत काय झाले ते लक्षात ठेवा. आता तरी सुधारा, वाईट उद्योग करू नका. लोक उद्या तुमच्या डोक्यात धोंडे घालतील.

– महागाईला जाबबदर कोण असे विकाहार्ट ठाकरे यांनी गॅसच्या वाढलेल्या दारांवर टीका केली. सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमीचा अहवाल सादर करीत २ कोटी जनतेचा रोजगार गेल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

– मुंबई महानगरपालिकेचे काम, कोविड काळात सरकारने केलेले काम सांगून ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, नवे उद्योग येत असून, राज्य एक नंबरवर आहे. मात्र पुरातत्व खाते अडवणूक करत आहे. कांजूर येथे अडवणूक केली जात आहे. धारावी येथील रेल्वेची जागा पैसे देऊनही मिळत नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नाही. फडणवीसांनी त्यासाठी केंद्रात जाऊन महाराष्ट्रासाठी आरडाओरड करावी.

– भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचा आव आणणारे, भ्रष्टाचारी असून, एकएक प्रकरणे बाहेर येत आहेत.  टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषदा घेतल्या जात आहे. अशा टिनपाट लोकांना केंद्राकडून सुरक्षा दिली जात आहे. असे लोक महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

– देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करताना ठाकरे म्हणाले, तुमचे वय काय, बोलता काय? तुम्ही नुसते बसले असते, तरी मशीद पडली असती.

– राज ठाकरे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, की बाळासाहेब झाल्यासारखे वाटत असणारे काही मुन्नाभाई फिरत आहेत आणि त्यांच्या मेंदूमध्ये केमिकल लोच्या झाला आहे.  उत्तर सभा घेण्याऐवजी, महागाईने होळपळणाऱ्या जनतेला उत्तर द्या.

– कॉँग्रेसबरोबर गेलो तरी हिंदूत्व सोडलेले नाही, असे सांगून ठाकरे म्हणाले आमचे हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि हाताला काम, असे आहे.

– आम्ही संयम बाळगतो, म्हणजे घाबरलेले नाही, असे सांगून ठाकरे यांनी क्रिकेटचे उदाहरण देत स्लेजिंग करणाऱ्या लोकांना बोलू द्या, विचलित होऊ नका, असं सल्ला त्यांनी शिवसैनिकांना दिला.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, “कोविड काळामध्ये महाराष्ट्राने केलेल्या कामाचे सर्व जगाने कौतुक केले. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. आशिया खंडातील सर्वांत मोठे रुग्णालय मुंबईमध्ये उभे केले. महागाई, बेरोजगारी, भेदभाव आणि जातीयवाद एका बाजूला असताना तुम्ही घर पेटवणार की चूल पेटवणार, हे ठरवले पाहिजे.”

Tags :