For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

a month ago | द वायर मराठी टीम
उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

मुंबई : मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा फेसबुक लाईव्ह करताना दिला. त्यांनी आपल्या विधानपरिषद पदाचाही राजीनामा दिला.

उद्धव ठाकरे यांनी आज रात्री फेसबुक लाईव्ह करून आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी जनतेशी संवाद साधला ते म्हणाले,

आजपर्यंतची वाटचाल चांगली झाली. रायगडला निधी दिला. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. आज मंत्रीमंडळात औरंगाबादला संभाजी नगर आणि उस्मानाबादला धाराशीव असे नाव दिले.

एखादी गोष्ट चांगली चालू असली की दृष्ट लागते. शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी आणि राष्ट्रवादी, कॉँग्रेस यांना धन्यवाद देतो. या सगळ्यांनी आजही नामांतर करताना साथ दिली. त्यांचा विरोध असल्याचे भासवले जात होते.

शिवसेना प्रमुखांनी अनेक छोट्या माणसांना मोठे केले आणि ते मोठे झाल्यावर शिवसेनेला विसरले. ज्यांना सर्वकाही दिले, ते नाराज आणि ज्यांना काही दिले नाही, ते पाठीशी उभे राहिले आहेत.

न्यायालयाचा निकाल मान्य आहेच. राज्यपालांनीही लोकशाहीचा मान राखला. कोणी पत्र दिल्यानंतर लगेच बहुमताचा आदेश दिला. अशोक चव्हाण यांनी येऊन सांगितले, की गरज असल्यास कॉँग्रेस-राष्ट्रवादी बाहेरून पाठींबा देईल.

केंद्र सरकार मुंबईत आपला बंदोबस्त वाढवत आहे. उद्या सेनाही आणली जाईल. मी आवाहन करतो की शिवसैनिकांनी या कोणाच्याही मध्ये येऊ नका.

उद्या बंदोबस्तात शिवसेनेचे रक्त मला सांडून द्यायचे नाही.

विठू माऊलीची पुजा माझ्या हस्ते हवी असे काही वारकरी म्हणाले होते.

माझ्या काळात दंगली पेटल्या नाहीत. मी पुन्हा शिवसेना भवनात बसणार आहे. शिवसेनेची नवी वाटचाल करणार आहे. मी विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे. आता मी तुमचा आहे, व सोबत आहे. सर्व शासकीय यंत्रणांचे मी ऋण मानतो.

माझ्या विरोधात मजा एकजरी माणूस उभा राहिला तरी मला ते अपमानास्पद आहे. मला डोकी मोजण्याच्या खेळात जायचे नाही. शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली खेचण्याचा आनंद त्यांना मिळू द्या. मला मुख्यमंत्री पद सोडण्याचे दुःख नाही. मला मोह नाही.

Tags :