For the best experience, open
https://m.marathi.thewire.in
on your mobile browser.

भारतातल्या तुरुंगातल्या एकूण कैद्यांपैकी ३० टक्के कैदी मुसलमान

11:19 PM Sep 18, 2022 IST | द वायर मराठी टीम
भारतातल्या तुरुंगातल्या एकूण कैद्यांपैकी ३० टक्के कैदी मुसलमान

नवी दिल्लीः भारतातील तुरुंगात सुमारे ३० टक्के कैदी हे मुसलमान असल्याची माहिती प्रिझन स्टॅटिस्टिक्स (कारागृह सांख्यिकी) इंडिया-2021च्या अहवालात आढळून आली आहे. या संदर्भातील वृत्त द हिंदूने प्रसिद्ध केले आहे. देशातल्या मुसलमानांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या १४.२ टक्के इतकी असून या टक्केवारीशी तुलना करता २ टक्के हा आकडा आहे.

या अहवालात भारतीय तुरुंगांचे चार प्रकार केले आहेत. त्यानुसार पहिल्या प्रकारात गुन्हेगार दोषी असून त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. दुसऱ्या प्रकारात गुन्हेगारांच्या विरोधात खटले चालू आहेत. पण ते तुरुंगात आहेत. तिसऱ्या प्रकारात खबरदारी म्हणून संशयित आरोपींना तुरुंगात ठेवलेले आहे. चौथ्या प्रकारात वरील तीनही प्रकाराशी यांचा संबंध नाही पण यांची संख्या अन्य कैद्यांच्या तुलनेत अत्यंत कमी अशी आहे.

२०२१मध्ये आसाममध्ये ६१ टक्के गुन्हेगार व ४९ टक्के विचाराधीन कैदी मुस्लिम होते. आसाममध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ३४ टक्के इतकी आहे. त्या नंतर गुजरात, उ. प्रदेश, हरयाणा व जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लिम कैद्यांची लोकसंख्येच्या तुलनेतील टक्केवारी अधिक आहे.

गुजरातमध्ये ३७२ मुस्लिम कैदी असून ही टक्केवारी अन्य कैद्यांच्या तुलनेत ३१ टक्के इतकी आहे. गुजरातमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १० टक्के आहे.

उ. प्रदेशात २२२ मुस्लिम कैदेत असून हे प्रमाण अन्य कैद्यांच्या तुलनेत ५७ टक्के आहे. उ. प्रदेशात मुस्लिम लोकसंख्या अन्य लोकसंख्येच्या तुलनेत १९ टक्के आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये २०२१मध्ये २५२ मुस्लिम कैदी होते. ही टक्केवारी अन्य धर्माच्या कैद्यांच्या तुलनेत ९४ टक्के इतकी आहे.

हरयाणात ४१ कैदी मुस्लिम असून येथे १०० टक्के कैदी मुस्लिम आहेत. हरयाणात मुस्लिम लोकसंख्या केवळ ७ टक्के आहे.

मूळ वृत्त

Tags :